Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील जैन स्थानकात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नवकार महामंत्राचा जप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील जैन स्थानकात आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नवकार महामंत्राचा जप घेण्यात आला .

माजी नगरसेवक ‘शशिकांत कदम‘ यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतः नवकार महामंत्राचा जप केला. यावेळी कासारवाडी ऑल इंडीया जैन कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष प्रा . अशोकमी पगारीया, विद्यासजी पगारिया हजर होते . प्रा. अशोक पगारिया यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याच्या गौरव करून त्यांची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना केली. तसेच या प्रार्थने करीता दापोडी येथील दापोडी जैन स्थानकाचे अध्यक्ष श्री कनय्यालालजी कर्नावट , दिलीपजी भन्साळी, किशोरजी कर्तावट, सुनिलजी कोठारी हजर होते.

Google Ad

या नवकार महामंत्र जप कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव जैन स्थानकाचे अध्यक्ष प्रा . सुरेश छाडीवाल , उपाध्यक्ष श्रीमती राशिकला गदीया , सौ . सुनिता भन्साळी, सचिव सौ . सविता बाढीया यांनी केले .

यावेळी आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नवकार महामंत्राचा जप घेण्याकरिता महर्षि युवक मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद ओस्तवाल , लौकिक कर्णावट, मोनिष गादीया , गणेश मुथा , संदीप दोशी , सचिन मुनोत , रोहीत जैन , गणेश बाढिया , शुभम छाजेड व पिंपळे गुरव येथील जैन युवक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!