Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांचे खंदे समर्थक ‘मारुती कवडे’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे खंदे समर्थक  ‘मारुती नागुजी कवडे’ (वय ६० वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आज मंगळवारी (२६ एप्रिल ) दुपारी १.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. मारुती कवडे यांच्या निधनाची माहिती कळताच नवी-सांगवी -पिंपळे गुरव परिसरात शोककळा पसरली, मूळचे पिंपळे गुरव गावचे मारुती कवडे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले-सून,मुलगी, भाऊ – वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.

Google Ad

आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मारुती कवडे हे भाजपच्या प्रभाग ३१ नवी सांगवी – पिंपळे गुरव चे काही काळ अध्यक्ष होते. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. बांधकाम व्यावसायिक असलेले कवडे हे ‘मारुतीभाऊ‘ नावाने परिसरात परिचित होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी मोठा मित्र परिवार जमवला होता, एम के चौक येथे असलेल्या गणपती मंदिराचे ते सल्लागार होते. त्यामुळेच त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या सर्व चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही ईश्वर चरणी प्रार्थना!

टीप :- त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सायंकाळी ०५.०० वा. निघणार असून अंत्यविधी पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!