Google Ad
Editor Choice Education

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी चिंचवड मधील १३ ग्रंथालयांस ग्रंथभेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जून) : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत – सन २०२०-२१ या वर्षात चिंचवड विधानसभा मतदार संघातील १२ शासनमान्य सार्वजनिक वाचनालायांना प्रत्येकी २५ हजार रुपये किंमतीची ग्रंथ संपदा भेट देण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप तसेच प्रमुख पाहुणे महापौर माई ढोरे आणि प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाऊसाहेब जाधव, उद्धव कवडे, मनोहर ढोरे, शरद ढोरे सर, पोखरकर सर, डॉ धनंजय राठोड उपस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील १२ वाचनालय आणि ग्रंथालयांस ही ग्रंथभेट देण्यात आली.

Google Ad

यावेळी साई मित्र मंडळ वाचनालय, सन्मित्र मंडळ वाचनालय, शब्दाली सार्वजनिक वाचनालय, हिरामनराव हाले ग्रंथ संग्रहालय, अक्षरानंद सार्वजनिक वाचनालय, प्रभाग वाचनालय, प्ररिन वाचनालय, धर्मगांग सार्वजनिक वाचनालय, श्रद्धा ग्रंथालय, हुतात्मा चाफेकर ग्रंथालय, बाळासाहेब भारदे ग्रंथालय, अभिनव वाचनालय यांना ही ग्रंथभेट देण्यात आली.

यावेळी बोलताना ‘शंकरशेठ जगताप’ म्हणाले, “आज इंटरनेटच्या जगात पुस्तके ही दुर्मिळ होत चालली आहेच , आणि समाजातील हीच गरज ओळखून आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवली, ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. प्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरू व्हावीत, याकरिता त्यांनी त्यांच्या विकासनिधीतून परिसरातील नागरिकांना वाचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

84 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!