Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मधील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांकरीता संपावर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) : कोरोना महामारित फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेचे नेहमीच कौतुक करण्यात आले आहे. याच वेळी काम करणाऱ्या आरोग्यसेविकांकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात घरोघरी जाऊन फिल्ड वरील सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा वर्कर्स आज पासून संपावर गेल्या आहेत. कोरोना काळात मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ७० हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर आहेत.

आशा वर्कर्सना कोरोना काळात दिवसाला ३५ रुपये इतका भत्ता दिला जात होता. म्हणजेच महिन्याला १ हजार रुपये भत्ता मिळतो हा भत्ता वाढवून महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी राज्य आशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ७० हजार आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या माध्यामातून आरोग्यविषयक ७२ प्रकारची कामे या आशा वर्कर्स करतात.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर आज या आशा स्वयंसेवीकानी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. यावेळी आरोग्य विभागातील भरतीवेळी प्राधान्य देऊन शासकीय सेवेत समाविष्ट करा, आरोग्यसेविका पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण द्या, आशा वर्कर्सना योजनाबाह्य कामे देऊ नका, थकीत मानधन त्वरित द्या, आमच्या कामाचा मोबदला निश्चित करा, कर्मचारी-कुटुंबियांसाठी व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवावेत, विमाकवचा आदेशात स्पष्ट उल्लेख करा, यामागण्या करण्यात आल्या. यासारख्या मागण्यांना घेऊन राज्यातील ७० हजार आशा संपावर गेले आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!