Google Ad
Editor Choice india

Delhi : भाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवीन टीम … खडसेंना पुन्हा डच्चू ; पंकजा मुंडे , तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान!

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या टीमची घोषणा केली आहे. नॅशनल सेक्रेटरी म्हणून एकूण १३ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या १३ जणांमध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांना जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. त्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांचा समावेश आहे.

याशिवाय खासदार हिना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत जागा मिळाली आहे तसेच जमाल सिद्दीकी यांना अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जागा देण्यात आली आहे.

Google Ad

भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या तोंडाला पानं पुसली आहेत. खडसे गेल्या काही महिन्यात सातत्यानं महाराष्ट्रात फडणवीसांविरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्र भाजपला शालजोडे दिले आहेत. परंतु केंद्रीय पातळीवरील भाजप नेतृत्वानं पुन्हा एकदा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसेंच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा आहे. हेही त्यामागील एक कारण असू शकतं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!