Google Ad
Editor Choice

पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली … सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला येणार भाजपचे हे बडे नेते

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : पुणे फेस्टिव्हल ३४ व्या सोहळ्याचे उद्घाटन आज शुक्रवार सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होत आहे. पुण्याच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.यासाठी निमित्त ठरला आहे तो, सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल. या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कलमाडींच्या पुणे फेस्टिवेहलला भाजप नेत्यांच्या गर्दीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Google Ad

२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा प्रकरणामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागलेहोते. त्यामुळे एकेकाळी पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या सुरेश कलमाडी यांची राजकीय इनिंग अचानक संपुष्टात आली होती. काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, गेली ११ वर्षे उलटूनही काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना लांब ठेवले आहे. तर दुसरीकडे सुरेश कलमाडी हे राजकारणात तितकेसे सक्रिय नसले तरी ते काही प्रमाणात आपली राजकीय ताकद राखून आहेत.

त्यामुळे ज्या कालमाडींवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईची मागणी केली होती त्याच कालमाडींच्या मांडीला मांडी लावून भाजप नेते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सहा तारखेला होणाऱ्या मिस पुणे स्पर्धेला अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत . यावर हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे असे स्पष्टीकरण कालमाडींकडून देण्यात आले आहे. सुरेश कलमाडी यांच्याविरुद्धचा खटला अजूनही सुरु असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता सुरेश कलमाडी यांनी स्वत:वरील कलंक धुवून काढण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!