Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

उसने पैसे दिले नाही म्हणून मित्राच्याच डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या … धारदार शास्रने वार करून आरोपी फरार!

महाराष्ट्र 14 न्यूज : उसने पैसे दिले नाहीत म्हणून युवकाने मित्राच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या , तसेच चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले . शनिवारी ( १० ऑक्टोबर ) रात्री अकरा वाजता कावेरीनगर येथे ही घटना घडली . बलवीर मुन्ना रजक ( वय २५ , रा . निगडी पुलाजवळ , पुणे , मूळ रा . मध्य प्रदेश ) असे जखमी तरुणाचे नाव आहे .त्याने याबाबत रविवारी ( ११ ऑक्टोबर ) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . पोलिसांनी या प्रकरणी मातादीन रजक ( रा . पडवळनगर , थेरगाव ) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बलवीर शनिवारी रात्री अकरा वाजता कावेरीनगर येथील ‘ सचिन वाइन्स ‘ या दुकानासमोरून जात होता . दुकानासमोर बलवीर याचा गावाकडील मित्र आरोपी मातादीन बसला होता . मातादीन याने बलवीरकडे उसने पैसे मागितले . बलवीरने पैसे दिले नाहीत . त्यावरून चिडून मातादीनने बलवीरच्या डोक्यात बिअरच्या दोन बाटल्या मारल्या . त्यानंतर मातादीन याच्या दोन साथीदारांनी बलवीरच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले आणि आरोपी पळून गेले .

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!