Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

माजी आमदार ‘विलास लांडे’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय … आगामी महानगरपालिका निवडणूकीची मोर्चेबांधणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीकाँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड कडे गांबिर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत . पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार गेल्या महिन्यात शहर दौऱ्यावर आले होते . त्या वेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणीच्या तयारीत राहा , अशा सूचना दिल्या होत्या . यानंतर लांडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ केला आहे .

मागील आठवड्यात खासदार अमोल कोल्हे यांनीही पिंपरी चिंचवडचा दौरा केला आणि अनेक इशारेही दिले. त्यावेळी त्यांनी सक्रिय होणार असल्याचेही सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे . पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप सव्वा वर्ष आहे . २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याने, त्यामुळे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे .

Google Ad

मागील विधानसभा निवडणुकीत लांडे यांचा पराभव झाल्याने ते निराश झाले होते . मात्र , पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिल्याने त्यांनी पुन्हा राजकारणात भरारी घेतली आहे . भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे . या बैठकांमध्ये पक्षासाठी करावयाचे काम व तयारीचा आढावा यावेळी घेतला जात आहे .

कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘विलास लांडे म्हणाले’, “ सत्ताधारी भाजपने गेल्या पाच वर्षांत भोसरी विधानसभा मतदारसंघात एकही नवीन काम उभे केलेले नाही . मतदारांना अजूनही ‘ व्हीजन’चेच गाजर दाखविले जात आहे . मी आमदार असताना जी विकासकामे आणि प्रकल्प सुरू होते , तीच पाच वर्षे झाली तरी सुरू आहेत .

यावेळी घेण्यात आलेल्या बैठकांना कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. विलास लांडे हे सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साहाचा प्रत्यय भोसरी विधानसभा मतदासंघात सोशल मीडियावर दिसू लागला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!