Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

दापोडी येथील त्रैलोक्य बुद्ध विहाराजवळ गाड्यांच्या काचा फोडून … दगड फेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५मे) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथिल त्रैलोक्य बुद्ध विहरा जवळ काचा फोडण्याची घटना सोमवारी (दि.२४ मे) रात्री उशिरा घडली. येथे तीन चाकी व चार चाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. चांगुणाई नगरमध्ये एक दुचाकी, एक चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच एका घरावर दगडफेक करत दहशत निर्माण केली. काही दिवसांपूर्वी येथे दोन रिक्षाच्या काचा फोडण्याची घटना घडली होती.

येथील वारंवार काचा फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गाड्या फोडल्याची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांचा तपास पोलिस करत आहे.

Google Ad

“सदर ठिकानी वारंवार अश्या घटना घड़त आहेत. उघड़यावर दारू पिऊन धिंगना घालने. दहशत माजवने असे प्रकार रोज़ घड़त आहेत, असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. सदर ठिकानी पोलिसानी गस्त वाढ़वावी अशी विनंती ”- राकेश अरुण काटे (वाहनमालक) यांनी केली. “या परिसरातील चौकात उभे राहुन दहशत निर्माण करन्याचा प्रकार होत असतात”.- विशाल जेटिथोर (सामाजिक कार्यकर्ते) यावेळी बोलताना म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

37 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!