Google Ad
Editor Choice

लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीने … बुद्ध जयंती निमित्ताने औंध कॅम्प येथे २६ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : कोरोनाच्या संकटकाळात होत असणारा रक्ताचा तुटवडा आणि ते मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ पहाता, लुंबिनी बुध्द विहार औंध कँम्प नवी सांगवी पुणे आणि भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सध्याच्या या संकटाच्या परिस्थितीत रक्ताची फार मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे.

गौतम बुद्धांची शिकवण आहे की, शिक्षण हे फक्त अर्थार्जन करण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दु:खाचा अंत करणारे एक क्रांतिकारी शस्त्र आहे हे युवकामध्ये रूढ होण्याची गरज आहे. एक धर्म म्हणून नव्हे तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून बुद्धांच्या विचारसरणीच्या आधारे आपले आचरण करण्याची नितांत गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या मूल्यांची व विचारसरणीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समज करून आजच्या तरुण पिढीने सम्यक मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे.

त्यांच्या या शिकवणीतूनच आपण रक्तदान करून आपली दान पारमिता या पवित्र दिनी वाढवू या असा संकल्प या समितीतील तरुणांनी केला आहे,

Google Ad

▶️रक्तदान शिबिराची वेळ आणि ठिकाण –
लुंबिनी बुद्ध विहार,औंध कँम्प नवी सांगवी बी, आर घोलप कॉलेज शेजारी , पुणे
दिनांक 26 मे 2021 बुधवार
सकाळी 9.00 ते 2.00 वाजेपर्यंत

🩸 रक्तदान नाव नोंदणीसाठी संपर्क
उपध्य- आयु. शाम घोडके 9860338107
सचिव – आयु. बाळासाहेब पिल्लेवार 9767310061

वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात येणार असून कृपया रक्तदान करण्यासाठी आपली उपस्थिती दाखवावी व संपर्क साधावा ही विनंती . असे अध्यक्ष- मोहन कांबळे लुंबिनी बुध्द विहार यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!