Google Ad
Editor Choice

कासारवाडीतील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमात … गुरुपौर्णिमे निमित्ताने समाजात योगदान देणाऱ्यांचा ‘गुरुगौरव पुरस्काराने’ सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील दत्त मंदिर हे साई सेवा कुंज आश्रम या नावाने ओळखले जाते. बुधवारी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी शहरातील विविध ठिकाणाहून भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सकाळी होमहवणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला, गाभाऱ्यात मूर्तीस सजवण्यात आले होते, दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करताना दिसत होते.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात गुरुपौर्णिमा निमित्त विविध सामाजिक , अध्यात्म, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरुगौरव सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले.  बुधवार दि १३/०७/२०२२ रोजी सकाळी होमहवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच सायं ६ ते ८ भजन व ह भ प बाबा महाराज काडगावकर  कीर्तनरुपी सेवा झाली यावेळी मोठया प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Google Ad

आज झालेल्या कार्यक्रमात ‘गुरुगौरव सन्मान’ श्री . गुलाबराव भिलारे ( स्ट्रक्चरल इंजिनियर ), श्री . बबनराव बाबुराव येडे ( उद्योजक ), श्री . राधाकिशन जगन्नाथ लाहोटी ( सीए ), अॅड . श्री . सखाराम कोळसे पाटील, श्री . प्रकाश नामदेव काटे ( उद्योजक ), श्री . विजय विष्णुपंत सातपुते ( वृक्षसंवर्धन , घोराडेश्वर डोंगर ), श्री . प्रकाश मिटभाकरे , श्री . विजय उर्फ आप्पा रेणुसे ( शैक्षणिक व क्रीडा ), डॉ . प्रदीप माकन ( वैद्यकीय क्षेत्र )

तसेच पंढरीच्या वारीमध्ये १५ दिवस वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणाऱ्यांना ‘पंढरी वारी आरोग्य सेवा सन्मान’ डॉ . देविदास हरिश्चंद्र शेलार, डॉ . मनीषा ज्ञानोबा साबणे ( वैद्यकीय अधिकारी आदित्य बिर्ला हॉस्पिटल ), श्री . भाऊसाहेब जगन्नाथ जाधव पॅरामेडिकल च्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.

यावेळी कीर्तनकार ह भ प बाबामहाराज काडगावकर, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे , ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प. सुप्रियाताई साठे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशीद ( अध्यक्ष , भंडारा डोंगर ट्रस्ट ), ह.भ.प. जयंत उर्फ आप्पा बागल ( सचिव , महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड शहर ) , ह.भ.प. राजाराम महाराज देवडकर ( मृदंगमणी ) यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच लोकमत चे पत्रकार संतोष महामुनी यांचा सत्कार करण्यात आला.

आणि ‘आदर्श माता सन्मान’ श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड, श्रीमती अनुसया माता, सौ . यमुनाबाई भटू करंजुले, श्रीमती आशाताई रवींद्र कामथे, सौ . उषा वसंत कुलकर्णी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गर्जे गुरुजी यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!