Google Ad
Editor Choice

जनसंवाद सभा संपताच दापोडी परिसराची पाहणी करून … अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण करण्याची घेतली दखल

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१८ जुलै) : महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी नेहमीप्रमाणे जनसंवाद सभा पार पडली. एकूण दहा तक्रारी अर्ज दाखल झाले होते. सर्वाधिक तक्रारी दापोडी परिसरातील उपस्थित होत्या. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे दापोडी परिसरात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे दापोडी परिसरातील माजी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, परिसरातील महिलांनी एकत्रित येऊन जनसंवाद सभेला मुख्य समन्वय अधिकारी यांच्या समोर तक्रारींचा भडिमार केला.

मुख्य समन्वय अधिकारी, संबंधित अधिकारी यांनी तक्रारी समजून घेऊन त्यांना सभा संपताच दापोडी परिसराची पाहणी करून तक्रारींचे निवारण करण्यात येईल. असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे दापोडी येथे दुपारी साडे बारा वाजता मुख्य समन्वय अधिकारी संजय कुलकर्णी, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, उपअभियंता अनिलकुमार राऊत, स्थापत्य शाखा अभियंता सुनील दांगडे, जल:निसारण उपअभियंता विजय शिंदे उपस्थित होते. यावेळी बॉम्बे कॉलनी, अत्तार भट्टी, वैराग चाळ, बेलवंडी चाळ, कुलकर्णी चाळ, सुंदरबाग चाळ आदी परिसराची पाहणी केली.
मागील आठवडयात मुसळधार पावसामुळे ड्रेनेज तुंबने, स्टॉर्म वॉटर लाईन नसल्याने रस्त्यावर पाणी साचने अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण आदी दापोडी परिसरातील जनसंवाद सभेत आलेल्या तक्रारींची पाहणी केली. बॉम्बे कॉलनी येथील ड्रेनेजचा विषय होता. येथील ड्रेनेज मध्ये वारंवार गाळ साचत असल्याने तेथील ड्रेनेज त्वरित साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या ठिकाणी नव्याने ड्रेनेज पाईपलाईन, पावसाळी पाणी वाहून जाण्याची पाईपलाईन टाकण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Google Ad

अत्तार भट्टी येथे पावसाळ्यात पाणी साचत असल्याने त्याठिकाणी नव्याने स्टॉर्म वॉटर पाईपलाईन त्वरित टाकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले. सुंदरबाग येथील रस्त्याची पाहणी केली. पावसामुळे येथील रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. येथील रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात पावसामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये टाकण्यात आला आहे. पाऊस थांबला की पुन्हा काम सुरू करण्यात येईल.
याआठवड्यात बॉम्बे कॉलनी येथील वैराग चाळ, कुलकर्णी चाळ येथील ड्रेनेज पाईपलाईन, स्टॉर्म वॉटर पाईपलाईन मंगळवार पासून त्वरित टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. येथील नागरिकांना आठ दिवसात येथील काम पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. भर पावसात अधिकारी छत्री हातात धरून पाहणी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!