Google Ad
Editor Choice

अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत *कवयित्री ललिता गाढवे यांच्या काव्य ललिता या काव्य संग्रहाचे प्रकाशन व हास्यकवी संमेलन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत कवयित्री ललिता गाढवे यांच्या काव्य ललिता या काव्य संग्रहाचे प्रकाशन व हास्यकवी संमेलनचे आयोजन करण्यात आले. काव्यानंद प्रतिष्ठान पुणे परिवारातील ज्येष्ठ सदस्या सौ.ललिता गाढवे,ठाणे यांच्या काव्यललिता या काव्य संग्रहाचे प्रकाशन दि.१७ जुलै २०२२ रोजी सांगवी, पुणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात थाटात संपन्न झाले.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रशांत शितोळे सरकार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ.श्री संदीप सांगळे, ज्येष्ठ अभिनेते सुधाकर वसईकर व सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री बाबासाहेब ढमाले होते. प्रकाशक संस्थेच्या वतीने काव्यानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.सुनिल खंडेलवाल,काव्य दौलत प्रतिष्ठान चे भुपेंद्र आल्हाट, शिव जिजाऊ महिला प्रतिष्ठान व सांगवी तनिष्का महिला व्यासपीठाच्या गटप्रमुख सौ. शितलताई शितोळे, सौ. उज्वला ताई ढोरे, सौ. सुषमा ताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशन समारंभ प्रसंगी सर्वांनी सौ.ललिता गाढवे यांना शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.

Google Ad

या प्रसंगी डॉ.संदीप सांगळे यांनी साहित्य म्हणजे काय या बद्दल विचार व्यक्त करत काव्य ललिता या संग्रहात असलेल्या कवितांविषयी थोडक्यात आपले विचार मांडले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्याचं आवाहन केले.

श्री.प्रशांत शितोळे यांनी कवितेला राजकारणाच्या नजरेतून कसं वाचता येतं याची प्रचिती सर्व रसिकांना करून दिली. कविता ही समाज जीवनाचा आरसा म्हणून काम करते आणि अनेक वळणावर मार्गदर्शक ठरते असे ही ते या वेळी म्हणाले.
प्रकाशक सुनिल खंडेलवाल यांनी प्रकाशन संस्था साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन व काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व लेखक वाचकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
लेखिका ललिता गाढवे यांनी आपल्या मनोगतात त्यांचा काव्य प्रवास उलगडला. त्यांच्या या काव्यसंग्रह निर्मितीत योगदान देणाऱ्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.


अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब ढमाले यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कविवर्य श्री अनिल दीक्षित, श्री भालचंद्र कोळपकर व सौ. संगीता झिंजुरके यांच्या हास्य कवितांचा कार्यक्रम झाला.राजकारणावरील विडंबन, नोटाबंदी, सद्याची ओके राजकीय परिस्थिती, नवरा बायकोच्या संवादावर आधारित विनोदी कविता, आदी हास्य कवितांच्या मैफिलीत संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री.रविंद्र निंबाळकर व अप्पासाहेब वाघमारे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब ढमाले, कार्याध्यक्ष बबनराव शितोळे, खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी, विलास हिंगे, अशोक भंगाळे, दिपक गायकवाड, अरुण पवार, सौ दिपाली बोंबले, श्री शिवाजी बंडगर, विठ्ठल नंदनवार, भानुदास भोरे, तसेच सौ. राधिका घोडके व श्री. रामदास गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!