Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरासाठी आणखीन एक अभिमानास्पद कामगिरी … ‘आयर्न मॅन’ स्पर्धा जिंकणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील स्पर्धांकांचे ‘शंकर जगताप’ यांनी केले कौतुक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरासाठी आणखीन एक अभिमानास्पद कामगिरी करून आलेल्या, नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत जगभरात प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे (आयर्न मॅन) या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातील असंख्य स्पर्धक भाग घेतात, पण ही स्पर्धा जिंकणारे काही निवडक स्पर्धक असतात या स्पर्धे मध्ये आपल्या पिंपरी चिंचवड मधील श्री.अमित लोंढे,श्री.वैभव ठोंबरे व श्री.स्वप्निल चिंचवडे यांनी ही स्पर्धा जिंकून आपल्या पिंपरी चिंचवडचे नाव या जगविख्यात स्पर्धेमध्ये कोरले आहे.

ही स्पर्धा जिंकून आल्यानंतर या तिन्हीही स्पर्धकांचे भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख,माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप,माजी पक्षनेते नामदेव ढाके सामाजिक कार्यकर्ते माऊलीशेठ जगताप,संजय मराठे,सुनील देवकर, योगेश चिंचवडे यांनी या स्पर्धकांचा शाल व पुस्तक देऊन याचा गौरव करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!