Google Ad
Editor Choice

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त, प. पू. अण्णासाहेब मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑगस्ट) : देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी प. पू. अण्णासाहेब मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देवांग कोष्टी समाज पुणे मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षा शिबीर आयोजीत करण्यात आले. याप्रसंगी आलेल्या समाज बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना समाजाच्या वतीने मोफत औषधाचे वाटप करण्यात आले.

त्याच प्रमाणे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा समाज बांधवांच्या उपस्थितीत तसेच अध्यक्ष सुरेश तावरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे वसंतराव म्हेत्रे सर यांचे उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Google Ad

यावेळी श्री अशोक भुते यांनी आलेल्या समाज बांधवांचे सहर्ष स्वागत केले, सचिव सुनील ढगे यांनी मागील सभेचा वृतांत वाचुन दाखविला, खजिनदार श्री भगवान गोडसे यांनी मागील वर्षाचा CA दिनेश तावरे यांनी प्रमाणीत केलेला जमाखर्च, ताळेबंद सादर केला.. सर्व सदस्यांनी त्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली.

श्री दत्तात्रय ढगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर समाजातील १ली ते १२वी पर्यंतच्या गुणी, हुशार विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन त्यांना प्रोत्साहित केले.. तसेच कोष्टी समाजातील गरीब, होतकरू व पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनींना देवांग कोष्टी समाज पुणे यांचे तर्फे एक वर्षाकरिता दरमहा रु.1000/- शिष्यवृत्ती देण्यात येते. आजपर्यंत अनेक गरीब, होतकरू व पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ देण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!