Google Ad
Editor Choice

Pune : अजितदादांनी रायफल शूटिंगचा आनंद घेत पुणे विद्यापीठात शब्दांचाही साधला अचूक निशाणा, म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. आज पुणे विद्यापीठात अजित पवार आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

Google Ad

यावेळी अजितदादांनी रायफल शूटिंगचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, अजितदादांनी अचून निशाणा साधला. यावेळी जिमची पाहणी करत असताना तरुणाच्या हातावरच टॅटू पाहिला आणि हा टॅटू मैत्रिणीच्या नावाचा आहे का? अजितदादांनी असं विचारताच एकच हश्शा पिकली.

पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रीडा संकुलचे उदघाट्न उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याच्या हस्ते पार पडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी रायफल शूटिंगचा आनंद घेतला. पहिले उदय सामंत यांनी अचूक निशाणा साधला. त्यानंतर अजितदादांनीही बरोबर निशाणा साधून उदय सामंत यांची बरोबर केली.

त्यानंतर, अजित पवार आणि उदय सामंत यांनी जिमची पाहणी केली होती. यावेळी, माहिती देणाऱ्याच्या तरुणाच्या हातावरील टॅटूकडे अजितदादांचं लक्ष गेलं आणि थेट तरुणा विचारलं, कुण्याच्या नावाचा टॅटू आहे मैत्रिणीचा का? असं विचारताच बघ्याच्या गर्दीत एकच हश्शा पिकला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अजितदादांनी तुफान टोलेबाजी केली.

पर्यावरण रक्षण संवर्धनसाठी एकत्र काम करा. ग्लोबल वर्मिंग साठी आपणच कारणीभूत आहोत. 356 दिवस पर्यावरण दिन साजरा केला पाहिजे. तरच पुढच्या पिढीला पर्यावरण बघता येईल, असं आवाहनही अजितदादांनी केलं.

जिथे गर्दी तिथे मास्क वापरा. आपल्या कुणी बोलवलं नाही तर रागवू नये. विद्यापीठाच्या निवडणुकीत माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं ती इथं आहे पण तरीही मागच्या काळात मला इथे यायला जमलं नाही, अजितदादा असं म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली. विद्यापीठातील विकास कामांसाठी 10 कोटींचा निधी जाहीर करतोय. आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही, उद्या आणखी कुणी सत्तेत येईल, परवा कुणी येईल पण आम्ही आहोत तो पर्यंत कामं करत राहणार, असंही अजित पवार म्हणाले. मी लावलेल्या झाडाची पाहणी अधून मधून करणार आहे. खत पाणी घालून उदय सामंत यांनी लावलेल्या झाडा पेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार आहे, असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हश्शा पिकली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!