Google Ad
Editor Choice

देवांग हॉस्टेल पिंपळे निलख येथे ध्यान योग शिबिर … ध्यान रत्न श्री पी व्ही.रामा राजू जी यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जून) :ध्यान’ ही अद्भुत, अनुपम अशी योगसाधना आहे. जी साधकाला सुक्ष्मातीसूक्ष्म अणुरेणुच्या आकारात अस्तित्वात असलेल्या परमात्म्याशी एकरूप होण्याची संधी प्रदान करते. ही संधी प्राप्त करण्यासाठी आज शेकडो साधक यांच्याकरिता शनिवार दिनांक 4 जून 2022 रोजी देवांग कोष्टी हॉस्टेल पिंपळे निलख येथे ध्यान योग वर संध्याकाळी पाच ते आठ यावेळेस एक कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ध्यान कसे करायचे ध्यानाचे महत्व समजावून देण्याकरता ध्यान रत्न श्री पी व्ही.रामा राजू जी यांचे मार्गदर्शन झाले .

तसेच उपस्थितांकडून श्री पी व्ही रामा राजू यांनी 45 मिनिट ध्यान करून घेतले व ध्यान झाल्यानंतर ध्यानाचे फायदे इत्यादी समजावून सांगितले. याप्रसंगी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश तावरे हेही उपस्थित होते व याप्रसंगी त्यांनीही उपस्थितांना दोन शब्द सांगितले. तसेच पिंपळे निलख च्या नगरसेविका सौ आरतीताई चौंधे उपस्थित होत्या. यावेळेस कार्यक्रमाला शरवण कुमार सर, शशी लोधी मॅडम, सतीश लिपारे, भाऊसाहेब जाधव, सुनील डाहाके, सौ गीतांजली खैरनार व सौ स्वाती डाहाके उपस्थित होते.

Google Ad

आज सारे जग योगासनाच्या मागे लागले असून योग आणि योगासन एकच असल्याच्या भ्रमात आहेत. योग हे एक विशाल क्षेत्र असून, योगसाधना ही अष्टांग योग मार्गातील एक प्रकरण आहे. प्राचीन भारतात आपल्या ऋषिमुनींनी दिलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला साकार करण्याची क्षमता केवळ योगसाधनेतच असल्याचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी यावेळी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!