Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृती सुधारणेसाठी कार्यकर्त्याचे व्रत … अभिषेक करत, घातले अष्टविनायकाला साकडं!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ एप्रिल) : काही नेते व कार्यकर्ते यांचे नाते अतिशय जीवाभावाचे असते याचा प्रत्यय नुकताच पिंपरी चिंचवड शहरात आला. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्यांना गेले सहा दिवस झाले रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

मात्र नेत्याची प्रकृती अस्वस्थ असताना इकडे त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनातही घालमेल होऊ लागली. तसं तर पिंपरी चिंचवड मधील अनेक कार्यकर्त्यांनी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रकृतीत (Good Health) लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्याने आपण आणखी काही व्रत करावं, असं ठरवलं आणि अष्टविनायक मधील आठही गणपतीना आपले भाऊ ठणठणीत बरे व्हावे यासाठी गणरायाच्याकडे अभिषेक करून प्रार्थना केली. त्यांचे बंधू विजूशेठ जगताप हे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्या मित्रमंडळी समवेत अष्टविनायक दर्शन वारी करत असतात.

Google Ad

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत,आपल्या नेत्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, नेत्याच्या दीर्घायुष्यासाठी एखादे व्रत केले पाहिजे, असे प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटू लागले. लक्ष्मण भाऊंचा चाहता वर्ग संपूर्ण शहरात आहे, प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.🔴श्री गजानन महाराज मंदीर सांगवी येथे प्रार्थना :

लक्ष्मणभाऊ जगताप आरोग्यावरील विघ्न दूर व्हावे आणि लक्ष्मणभाऊ यांना पुन्हा लोकमानसात गणरायाने येण्याची शक्ती व बळ द्यावे यासाठी आज अंगारकी चतुर्थीच्या दिव्य योगाने, भाऊंच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा घडावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्री गजानन महाराज मंदीर सांगवी येथे महामृत्युंजय मंत्राचा जप पठण आणि श्री चा आभिषेक करण्यात आला.

🔴पिंपळे गुरव येथे रात्री ९ : ३० वाजता महाआरती :

लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी दिं १९ – ०४-२०२२ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मंगल दिवशी रात्री ९ : ३० वाजता महाआरती करण्यात येणार आहे . यावेळी सर्व पिंपळे गुरव ग्रामस्थ , पिंपळे गुरव , सांगवी मधील नागरिक , बंधु , भगिनी आणि भाऊंवर प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग उपस्थित राहणार आहेत. असे सुर्यमुखी गणेश मंदीर , काशिद नगर पिंपळे गुरव यांनी कळविले आहे.

प्रकृतीत सुधारणा , कुटूंबियांकडून कृतज्ञता व्यक्त :

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे हळूहळू उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे . सर्व स्तरातून करण्यात आलेली प्रार्थना , जनतेचे आशीर्वाद , वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आधार याबद्दल आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप व विजय जगताप यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे . भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले आहे .

पिंपरी चिंचवड शहराचे आराध्य दैवत श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात  ‘ सामुदायिक महाअभिषेक ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!