Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ एप्रिल २०२२) :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी माजी नगरसदस्य सुरेश भोईर, माजी नगरसदस्या अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, नितीन देशमुख, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड उपस्थित होते.

Google Ad

          १८ एप्रिल १८९८ रोजी स्वातंत्र्यपूर्व क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.   या घटनेला आज १२४ वर्षे पूर्ण झाली.  दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.  त्यानंतर वासुदेव हरी चापेकर यांना ८ मे १८९८ तसेच बाळकृष्ण हरी चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.  महादेव विनायक रानडे यांना देखील १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आले.  भारतमातेसाठी एकाच घरातील तीन सख्खे भाऊ तरूण वयात  फाशी जाण्याची देशातील पहिलीच घटना आहे.  अशी माहिती क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीकडून मिळाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!