Google Ad
Editor Choice Technology

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवली सौरऊर्जेवर चालणारी ई-बाईक; शकंर जगताप यांनी शाब्बासकी थाप देत … ई- बाईकचाही घेतला आनंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयातील नववी व दहावीच्या ऑटोमोमोबाईल ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या दोन इलेक्ट्रिकल दुचाकींची (ई-बाईक) निर्मिती केली आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी गुरूवारी (दि. २०) शाळेत जाऊन या ई-बाईकची पाहणी केली आणि निर्मितीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

त्याची निर्मिती करणारे विद्यार्थी हणमंत सुरवसे, राधिका पुजारी, आशुतोष काळे, मयुरी वाघमारे यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक संतोष शेंडगे यांचा शकंर जगताप यांनी सत्कार केला. तसेच ई-बाईक चालवून पाहिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून महापालिका शाळांमधील अन्य विद्यार्थ्यांमध्येही नवसंशोधनाची वृत्ती वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” आणि “व्होकल टू लोकल” या अभियानांतर्गत सौरऊर्जेवरील ई-बाईक निर्मितीचे संशोधन व अन्य बाबींसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थी व प्रशिक्षकांना दिले.

Google Ad

महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयात केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यातील ऑटोमोबाईल ट्रेडचा हणमंत सुरवसे, राधिका पुजारी, आशुतोष काळे, मयुरी वाघमारे या चार विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-बाईकची निर्मिती केली आहे. त्यासाठी प्रशिक्षक संतोष शेंडगे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ई-बाईकची निर्मिती केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी गुरूवारी थेरगावमध्ये शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या ई-बाईकची पाहणी घेतली.

या ई-बाईक निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकाने घेतलेले कष्ट व त्यांच्यातील संशोधनवृत्तीची शंकर जगताप यांनी माहिती घेतली. दुचाकीच्या विविध सुट्ट्या भागांची स्क्रॅपमधून जुळवाजुळव करून या ई-बाईकची निर्मिती केल्याचे प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सांगितले. शंकर जगताप यांनी ई-बाईक चालवून पाहिली. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या या संशोधनवृत्तीचे त्यांनी कौतुक केले. हणमंत सुरवसे, राधिका पुजारी, आशुतोष काळे, मयुरी वाघमारे या विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तसेच प्रशिक्षक संतोष शेंडगे यांचाही त्यांनी सत्कार केला. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती आहे. त्याला ई-बाईकची निर्मिती करणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळे आणखी बळ मिळेल, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला. तसेच या विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, शिक्षक ए. व्ही. फुगे, के. एस. टकले, एस. ए. दुर्वे, व्यवसाय प्रशिक्षक सायली गोरक्ष, शिक्षण मंडळाच्या माजी सभापती मनिषा पवार, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम बारणे, तानाजी बारणे, सनी बारणे आदी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!