Google Ad
Editor Choice

दिवाळी : वसुबारस ते भाऊबीज , जाणून घ्या दिवाळीतील तिथी , वार , मुहूर्त आणि दिनविशेष!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑक्टोबर) : दिवाळी हा सण खूप आनंदाचा असतो. दिवाळी हा असा सण आहे की तो ५ दिवसांचा असतो. आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सण साजरे करायला मिळतात. तसेच आपला उत्साह वाढवण्यासाठी आणि आपल्याला दिलासा देण्यासाठी बाप्पा येऊन गेले, देवीनेही वातावरणात चैतन्य पसरवले आणि आता पुन्हा एकदा उत्सवाचा माहोल घेऊन दिवाळी हजर झाली आहे. एक-दोन नाही, तर पाच दिवसांचा हा सण. अनेक ठिकाणी घराघरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयारीला सुरुवात देखील झाली असेल.

तसेच अनेक ठिकणी दिवाळीचे फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, करायला सुरुवात देखील झाली आहे. तसेच दिवाळी हा सण वसुबारस पासून ते भाऊबीज पर्यंत साजरा केला जातो. काही सणांची शास्त्रानुसार पूजा केली जाते. दिवाळी या सणांमध्ये मुहूर्त यांना खूप महत्व आहे.

Google Ad

दिवाळीतील सणांची तारीख आणि मुहूर्त जाणून घेऊयात

▶️वसुबारस :-
दिवाळीच्या सणाला वसुबारसपासून सुरुवात होते. वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असे देखील म्हणतात. यामध्ये गाई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. तसेच वसुबारस हा सण २१ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे. हा सण सायंकाळी ५.२९ वा. पासून ८. ०७ मिनीटां पर्यंत मुहूर्त आहे.▶️धनत्रयोदशी :-
धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी धनत्रयोदशी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची त्याच बरोबर लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशपूजन देखील केले जाते. या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६. २८ मिनिटांनी ते ७. १५ मिनिटांपर्यंत आहे. धनत्रयोदशी यमाला दिवा दान केला जात असे.

▶️नरक चतुर्दशी :-
नरक चतुर्दशी हा सण यंदा २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे . यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकच दिवशी साजरा करण्यात येत आहे. नरक चुर्दशीचा दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ केली जाते. आणि पायाखाली करांटे घेऊन फोडली जातात. संध्याकाळी ६. २८ मिनिटाचा पूजेचा मुहूर्त आहे.

▶️लक्ष्मीपूजन :-
लक्ष्मीपूजन यावेळी २४ ऑक्टोंबर २०२२ रोजी आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजन केल्यास घरात लक्ष्मीचा वावर राहतो. आणि सुख समृद्धी नांदते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी दागिन्यांची, झाडूची , पुस्तके , धातू यांची देखील पूजा केली जाते. सायंकाळी ६ वाजून ते ८. ३८ पर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन चा दिवशी एकमेकांना फराळासाठी आमंत्रण केले जाते.

▶️बलिप्रतिपदा :-
यावेळी बलिप्रतिपदा, भाऊबीज , दीपावली पाडवा २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे. बलिप्रतिपदा हा दिवाळीचा चवथा दिवस म्हणून साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बळिराजा हा शेतकरी राजा होता. हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा केली जाते. बलिप्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे.▶️दीपावली पाडाव :-
दीपावली पाडवा हा सण दिवाळीत साजरा केला जातो. तसेच हा सण नवरा बायकोचा आहे. या दिवशी एकमेकांना भेट वस्तू देतात. तसेच यादिवशी बायकोने नवऱ्याला उटणं लावून त्याला औक्षण करण्याची प्रथा आहे. अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असा आहे. तसेच दीपावली पाडवा २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे.

▶️भाऊबीज :-
भाऊबीज हा सण दिवाळीत खूप महत्वाचा सण मानला जातो. भाऊबीज म्हटले की घरात आनंदाचा वातावरण असते. भाऊबीज हा सण बहीण भावाच नातं घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाला घरी बोलवते. आणि त्याचे औक्षण करते आणि त्याचा दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी एकमेकांना भेट वस्तू देणे ही प्रथा आहे. यावेळी भाऊबीज २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे. भाऊबीजेचा मुहूर्त दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!