Google Ad
Editor Choice

जुनी सांगवी बॅंक ॲाफ महाराष्ट्र ते विष्णूपंत ढोरे चौक (माकन चौक) रस्ता सांगवीकरांसाठी … “असुन अडचन नसून खोळंबा” मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी बॅंक ॲाफ महाराष्ट्र ते विष्णूपंत ढोरे चौक ( माकन चौक) हा रस्ता गेली सहा महिने झाले चुकीची पार्किंगमुळे रोज ट्रॅाफीक जाम होत आहे. दोनच दिवसा पूर्वी, मनसे पदाधिकारी यांच्याकडे तक्रार आली येथे की या रोडवर ॲब्युलस अडकली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी त्वरित कार्यकर्त्यांच्या मदतीने ॲब्युलस बाहेर काढली व पेशंटचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला, तरी यावर आरटीओने त्वरित नियोजन करावे अन्यथा मनसेच्या वतिने प्रशासनास समक्ष भेटून चर्चा व तक्रार लवकरच करणार आहोत, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

Google Ad

जुनी सांगवी बॅंक ॲाफ महाराष्ट्र ते माकन चौक येथे स्मार्ट सिटी अंतर्गत कॅाक्रेटिक मोठा रस्ता करण्यात आला आहे पण हा नागरिकांना किंवा वाहन चालकांच्यासाठी नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅव्हल्स बसेस तसेच स्कूल बसेस इत्यादी वाहने लावण्यासाठी केला आहे का ?

असा सांगवीतील रहिवाशांना प्रश्न पडला आहे जवळपास एक वर्षे होत आहे नागरिकांना रस्ता वापरासाठी खुला केला पण हा रस्ता “असुन अडचन नसून खोळंबा”  अशी अवस्था झाली आहे, कारण दोन्ही बाजूला फुल्ल पार्किंग असते पण यावर कोणीही बोलायला तयार नाही प्रशासन काही कारवाई करत नाही. लवकर नियोजन नाही झाल्यास मनसे स्टाईलने आमच्या पध्दतीने लवकरच करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे मनसेच्या वतीने राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)  यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मनसेचे पदाधिकारी साईराज भोसले, सुरेश सकट, मनोज महाजन, गणेश माने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!