Google Ad
Editor Choice

मराठवाडा जनविकास संघातर्फे कष्टकरी वर्गाला दिवाळी फराळ व पोशाखाचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ ऑक्टोबर) : मराठवाडा जनविकास संघातर्फे कष्टकरी वर्गाला दिवाळी फराळ व पोशाखाचे वाटप करण्यात आले. श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या दृष्टीने पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ‘आनंदाची दिवाळी अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची, नंतर पाहू आपली’, या भूमिकेतून मिठाई व महिलांना साडी, पुरुषांना पोशाख भेट देण्यात आला.

मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, दत्त आश्रमाचे ह.भ.प. समाधान महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ जगताप, तानाजी जवळकर, माजी नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे, अॅड. श्वेता इंगळे यांच्या हस्ते घरकाम करणाऱ्या महिला, सफाई काम करणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती, पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, पोस्टमन महिला व पुरुष कामगार यांना साडी चोळी, पोशाख, तसेच मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

Google Ad

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, नितीन चिलवंत, सूर्यकांत कुरुलकर, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, महादेव बनसोडे, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, प्रदिप गायकवाड, जावेद शेख, आरीफ सलमानी, अॅड. शितोळे, स्वप्नील वाघमारे, बळीराम माळी, विजय वडमारे, किशोर आटरगेकर, बाळासाहेब साळुंखे, अमोल लोंढे, विजया नागटिळक, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, “अरुण पवार यांनी या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून दीनदुबळ्याची सेवा केली आहे. दिवाळी सर्वजन साजरी करतात, पण जे खरे कष्टकरी असतात, त्यांची दिवाळी अगोदर साजरी झाली पाहिजे, असा उद्देश ठेवून अरुण पवार अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असतात”.

शारदाताई मुंडे म्हणाल्या, की कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने आयोजित केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!