महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सांगवीतील गजानन महाराज मंदिरासमोरील मैदानात सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी सांगवी मधील महिलांसाठी गरबा व दांडिया स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये साडेतीनशेहून अधिक महिला, लहान मुले व मुली यांनी नृत्यासाठी आपला सहभाग नोंदवला होता .या स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन कृष्णा भंडलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा करोते यांनी केले .
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कु. ऋतुजा धर्माधिकारी, कु. चैत्रा कुलकर्णी श्रीमती. प्रतीमा आदम, लता कांबळे ,पूजा पाटील,शीतल शिलवंत, निशा कुंभार, राऊत मॅडम कुमुद वाघमारे , मयुरा कटके,हर्षदा मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. सिनेट सदस्य संतोष ढोरे सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, दिलीप तनपुरे, खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे ,ज्येष्ठ नागरी संघाचे श्री बंडोपंत शेळके, कमलाकर जाधव, महिला अध्यक्ष दर्शना कुंभारकर , कोमल गौडाडकर, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, शारदा सोनवणे , तृप्तीताई कांबळे, आप्पा ठाकर ,धनंजय ढोरे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आगामी येणाऱ्या ‘काटा किर्र‘ या चित्रपटाचे निर्माते, मुख्य कलाकार सतीश देवकर चित्रपटाचे दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, कलाकार जहीर पटेल यांनी उपस्थिती लावली. तसेच चित्रपटातील काटा किर्र या गाण्याचे गायन करून सर्व उपस्थित सांगवी कर यांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सहभागी संघास सन्मान चिन्ह तसेच सहभागी महिलांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सहभागी महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला हे व्यासपीठ सौ सारिका भंडलकर यांनी दिले व आमच्यातील आत्मविश्वास जागा केला .आम्ही बहुतांश महिला यामध्ये पहिल्यांदा सहभागी होऊन इतक्या कमी कालावधीत अतिशय छानपणे हे नृत्य शिकलो व सादर करू शकलो या मागची प्रेरणा आणि श्रेय हे सौ सारिका कृष्णा भंडलकर यांचेच आहे .आगामी काळातही त्यांनी असे कार्यक्रम चालू ठेवून महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम करावे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.