Google Ad
Editor Choice

Satara : भुईंज पोलीस स्टेशन, सातारा वरील अनाधिकृत पत्राशेडवर त्वरित कारवाई करण्याबाबत … भारतीय मराठा महासंघ आक्रमक .

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने आज (दि. ११ ऑक्टोबर) भुईंज पोलीस स्टेशन सातारा यांना निवेदन केले आहे, की भुईंज पोलीस स्टेशन सातारा यांच्याकडून सर्व नियम धाब्यावर मारून येथे पोलीस स्टेशनच्या टेरेसवर अनाधिकृत पत्रा शेड मारून अनधिकृत वापर करत आहे.

या विषयासंदर्भात ऋषिकेश पिराजी कानवटे पुणे उपाजिल्हाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ यांनी नेविदनात म्हटले आहे की, भुईंज पोलीस स्टेशन सातारा यांनी कोणतेही अधिकृत प्राधिकरणाची किंवा शासकीय विभागांची परवानगी घेतली नाही, तरीही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी अनाधिकृत बांधकाम करून नियमांना पाय धुळीस मिळवत आहेत, यामधून सामान्य नागरिकांनी काय बोध घ्यावा हा एक प्रश्नच आहे.

Google Ad

पोलीस प्रशासनाकडून सामान्य नागरिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांना स्वतः धुळीस मिळवतात परंतु पोलीस प्रशासन मात्र स्वतः अधिकृत बांधकाम करून समाजामध्ये चुकीचे संदेश जात आहेत याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा भारतीय मराठा महासंघा कडून आपणा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल. असा इशाराही देण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!