Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याबाबत भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांची निवेदन देऊन मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याबाबत भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांची निवेदन देऊन मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आली पण पिंपरी चिंचवड मनपा माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय मध्ये मराठी मिडीयम मध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियम मध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाही.

Google Ad

यामुळे पिंपरी चिंचवड शहरतील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने पाचवी ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश चालू करावे व वर्ग संख्या ही एक असून ती प्रत्येक दोन करण्यात यावी असे वाळुंजकर यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत मनपा आयुक्त शेखर सिंग यांनी सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले व पुढच्या कार्यासाठी अधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!