Google Ad
Editor Choice

भक्तांच विठ्ठलावरचं प्रेम … एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला दिला एक कोटींचा सोन्याचा मुकुट भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जुलै) : पांढरी ला जाणारे विठ्ठल भाविक भक्त दरवर्षी  मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारीत चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल २ वर्षांनी पंढरपूरची वारी  पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. पंढरपूर, आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वैष्णवांचा महासागर जमलेला आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तब्ब्ल दोन वर्षांनी कोरोनाचे संकट दूर झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये. नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट भेट दिलाय.

Google Ad

एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट देणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट म्हणून देण्यात आलंय. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचे मुकुट भेट देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम पार पडेल. विजयकुमार उत्तरवार उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. आर्य वैश्य कोमटि समाजाच्या वतीने उत्तरवार यांचा केला जाणार सत्कार .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!