Google Ad
Editor Choice

माऊली तुकोबांच्या वारकऱ्यांना दवा देणाऱ्या लक्ष्मणभाऊंना … पांडुरंगाच्या भक्तांनी दिली दुवा! आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने पालखी सोहळ्यात हजारो भक्तांना मोफत औषधे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२जुलै) : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहेत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीला पायी चालत निघाले आहेत. आज रविवारी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बरड  येथील मुक्काम करून नातेपुते मुक्कामी असणार आहे. तर दुसरीकडे जगद्गगुरू तुकोबाराय यांच्या पालखीसोहळा  इंदापूर मुक्काम करून अकलूजला आली.

त्यासाठी वारकऱ्यांनी पायी वारी पंढरपुरकडे मार्गक्रमण करत आहे. आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. या वारी दरम्यान पुणे ते पंढरपूर हा खूप मोठा प्रवास असून सर्व लहानथोर वारकरी हा प्रवास पायी करतात, यामध्ये राहणे खाणे व्यवस्था ही असते, परंतु या प्रवासात या लाखो वारकऱ्यांना गुढगे दुखणे, सर्दी खोकला, थंडी ताप या विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जात प्रवास करावा लागतो.

Google Ad

दिंडीत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्याचे हाल होऊ हे ओळखूनच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता दोन अंबुलन्स, डॉक्टर आणि इतर कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता पुणे ते पंढरपूर अशी अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.पंढरीच्या वारीत सेवा देण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर डॉ. मनीषा साबणे, डॉ. देविदास शेलार तसेच परमेडीकल चे विद्यार्थी आपली आरोग्य सेवा देत आहेत. तर संत तुकारामांच्या पालखी मार्गावर डॉ. माऊली घोलप, भाऊसाहेब जाधव, हरिश्चंद्र गायके तसेच परमेडीकल चे विद्यार्थी वारकर्यांनाया अयोग्य सेवा देत आहेत.

या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरीता दोन रुग्णवाहिका आणि सात पिण्याच्या पाण्याचे टँकर ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून सेवेकरिता देण्यात आले आहेत . यंदा ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहेत असे चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.शंकरशेठ जगताप यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!