Google Ad
Editor Choice

एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेत्यांशी संपर्क , चर्चेसाठी तयार , वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : कालपासून नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याशी अखेर शिवसेनेकडून संपर्क झाला असल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आलंय.

शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला सूरतला बोलावलं असल्याची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात आता शिवसेनेला यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचंय. एकनाथ शिंदेबाबत थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचा नेमका कोणता नेता एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी रवाना होते, हे कळू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सूरतमधील एका हॉटेलात असून त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचीही माहिती आहे. एकनाथ शिंदेचं बंड थोपवण्याचं आव्हान सध्या शिवसेनेसमोर उभं ठाकलंय. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.

Google Ad

सर्व आमदारांशी आमचा संपर्क झालाय
याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. जसे चित्र निर्माण केलं आहे. तसं काही भूंकप वगैरे आहे. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण हा पॅटर्न चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!