Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळखट्याक नंतर … जुनी सांगवीत चुकीच्या निकृष्ट कामाची दुरुस्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : जुनी सांगवीत बाबुराव ढोरे भवन ते विष्णुपंत ढोरे चौका पर्यत डांबरीकरणाचे काम मागील आठ दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंद केले होते, यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित डांबरीकरणचे सुपरवाझरला विचारणा केली जाब विचारला पावसातील डांबरीकरणाचे चुकीचे काम त्वरित थांबवण्यास सांगितले.

मनपा ठेकेदाराच्या सुपरवाझरने सांगितले आमच्या ठेकेदारांने पावसातही काम पुर्ण करायला सांगितले आहे. त्यावेळी मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी स्थापत्य विभागाचे संमधित अधिकाऱ्यांना त्वरित बोलावून घेतले व त्वरित काम थांबवायला सांगितले न थांबल्यास आम्हाला यावर येथेच ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे सांगितले. यानंतर काम थांबवण्यात आले व डांबरीकरणरणाचे दोन भरलेले ढम्पर तेथून काढून घेतले व सर्व मशनरी हटवण्यात आल्या तसेच हे सर्व डांबरीकरण काढून पुन्हा नविन करून घेऊ असे आश्वासन दिले .

Google Ad

काल (२०जून) दुपारी बाबुराव ढोरे भवन ते विष्णुपंत ढोरे चौक (संविधान चौक) पर्यतचे डांबरीकरणाचे सर्व काम पुर्ण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्थापत्य विभागाचे धन्यवाद मानल्याचे राजू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!