Google Ad
Editor Choice

पुणे विद्यापीठात पार पडला सैनिक परिवाराच्या वतीने … वीर नारिंचा सन्मान सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि २८ मे) : देशात राहून देशासाठी काम करणारे अनेकजण आहेत. परंतु, देशासाठी प्राणाची आहुती जवान देत असतात. त्यांचे कुटुंबीय देखील देशासाठी त्यांचे प्राण अर्पण करण्याकरिता त्यांच्या मागे ठाम उभे राहतात, त्यामुळे त्यांचे बलिदान हे सर्वात मोठे आहे. बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीर माता व वीरा पत्नी आहेत. भारत मातेच्या सुपत्राबद्दल असणारा अभिमान म्हणजेच देशाचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानांच्या पत्नीचा गौरव करून त्यांच्या पंखांना अधिक बळ देण्यासाठी त्यांना ‘वीरनारी सन्मान’ सैनिक परिवार उद्योजकता सेमिनार दिनांक २८ मे रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तथा शंतनुराव किर्लोस्कर अध्यसनातर्फे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमात विरनारींचा सन्मान गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला , या कार्यक्रमाचे आयोजन मा . कॅप्टन चंद्रशेखर चितळे, व अधार सेवा संस्थानचे अध्यक्ष , जमूनाताई रनसिंग यांनी केले. यावेळी सहा वीर नारीना त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले.

Google Ad

यावेळी या कार्यक्रमात सैनिकांच्या वीर पत्नी तसेच आमृता देसाई (संचालक किशोर पंप) , अनुपमा पवार उपायुक्त कौशल्य विकास, रोजगारस् उधोजकता विभाग-पुणे), स्मिता सौनी (व्यवस्थापण सल्लागार), जोत्सना गर्गे-अध्यक्ष भारतीय सैनिक नारी शक्ती) , भाग्यश्री मंथाळकर (संचालिका MNGL), पारनेर तालुका अध्यक्ष कारभारी पोटघन, संतोष दिवटे, कर्नल शेळके, कर्नल कारेकर , कॅप्टन मोरे, कर्नल बालेवार उपस्थीत होते . तसेच किर्लोस्कर कंपनीच्या सुमनताई किर्लोस्कर यांचीविशेष उपस्थीती लाभली.

उपस्थित पाहुण्यांनी वीर नारीना उद्योग व्यवस्थापना बद्दल मार्गदर्शन केले, व त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन ते करत असलेल्या व्यवसायाचे कौतुक केले.जवानांसाठी काही करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे रहा, असे मत भागवत कथाकार जमुनाताई रणसिंग यांनी व्यक्त केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!