Google Ad
Editor Choice

” ८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही ” … पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८मे) : गरिबांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं ही आमची वचनबद्धता आहे. त्यामुळेच आम्ही ३ कोटींपेक्षा अधिक गरिबांना पक्की घरं बांधून दिली. तर १० कोटींहून अधिक कुटुंबांना ओडीएफ मधून मुक्ती दिली असून ९ कोटींहून अधिक गरीब महिलांची धुरापासून सुटका केली आहे.

असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट मध्ये वक्तव्य केलं आहे. अटकोट याठिकाणी नव्यानं बांधलेल्या मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

भाजने गेल्या आठ वर्षात २.५ कोटी पेक्षा अधिक गरीब कुटुंबांना वीज पुरवली आहे. तर ६ कोटींहुन अधिक कुटुंबाना वीज उपलब्ध करून दिली. आठ वर्षात मी माझं डोकं कोणापुढं झुकू दिलं नाही. आमचं सरकार नागरिकांना १०० टक्के सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोहिम राबवत आहेत. प्रत्येक नागरिकाला सुविधा उपलब्ध करून देण्याचं आमचं उद्दिष्ट असेल. यात कोणताही भेदभाव अथवा भ्रष्टाचाराला थारा नाही. कोरोना महामारीच्या काळात देशाचं मोठं नुकसान झालं. मात्र गरिबांना आमचं सरकार कुठंही कमी पडलं नाही. असंही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसात केंद्रात भाजपला सत्तेत राहुन ८ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यासंदर्भात देखील त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. तसेच पुढील २५ वर्ष आपल्याला अजून देशसेवा करायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत: झोकून देऊन काम केलं पाहिजे, अशा प्रकाराच्या सुचना देखील त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.

दरम्यान, सध्या महागाई, दरवाढीमुळे सामान्य लोकांचं हाल होत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस पक्षांनी जोरदार आंदोलने केली. याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसेच केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारने देखील इंधन कर कपातीचा निर्णय घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!