Google Ad
Editor Choice

ऊरळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराचा हा भयानक थरार  … दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ऑक्टोबर) : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे भर दिवसा दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण त्यांचा रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेने मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.

संबंधित घटना ही पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. ऊरळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराचा हा भयानक थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे अजिबात भय नसल्याचं हे पुन्हा एकदा समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात गोळीबाराची घटना घडत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवला असं म्हणता येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. पण आता पुण्यात थेट भर चौकात गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आतातरी पोलीस यंत्रणा जागी होईल, अशी आशा सर्वसामान्यांकडून बाळगली जात आहे.

Google Ad

▶️नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचन येथे दोन गुन्हेगार टोळींकडून पूर्ववैमनस्यातून भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात एका टोळीतील संतोष जगताप आणि इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. लोणीकाळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील तळवेडे चौकात ही गोळीबाराची घटना आज दुपारी घडली. या गोळीबाराच्या घटनेमध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामधील दोघांची प्रकृती अतिशय म्हणजे अत्यंत गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

▶️गोळीबारामागे नेमकं कारण काय?

अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष जगताप याच्यावर देखील फायरिंग झाली आहे. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नेमकं काय घडलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुद्ध भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगतापवर पूर्वीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याचे समजते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!