महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : सांगवी येथील खान्देश मित्र मंडळ परिवाराच्या वतीने सर्व पिंपरी चिंचवड, पुणे परिसरातील खान्देशी बंधू- भगिनींनी शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसऱ्यानिमित्त सकाळी ठीक १२.०० वाजता दसरा मेळावा म्हणजेच सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी मंडळाचे दप्तर पूजन आणि गणेश प्रतिमा पूजन केले. आपल्या प्रास्ताविक मध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश बोरसे सर यांनी मंडळाविषयी मागील १२ वर्षाचा थोडक्यात आढावा सांगितला. पुढील वर्षभरासाठी कार्यक्रमाची माहिती दिली आणि वार्षिक स्नेहमेळावा विषयी रूपरेषा ठरविण्यात आली. आणि कार्यकारिणीत नवीन बदला बद्दल माहिती दिली. नवीन पदभार झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर मंडळाचे सचिव मनोहर पवार सर यांनी मागील मिटिंगचा थोडक्यात वृत्तांत सादर केला. येणाऱ्या पुढील वर्षी असणाऱ्या क्रयक्रमाची माहिती दिली. आजच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये जमलेले सर्व संचालक आणि सभासद बंधूंनी अपसमध्ये सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मंडळाची आर्थिक बाजू कशी भक्कम करता येईल त्यावर चर्चा झाली.या मुळे आपल्याला भविष्यात चांगल्या दर्जाचे कार्यक्रम आयोजित करता येतील असे सर्वांनी आपल्या बोलण्यातून सांगितले.
या कार्यक्रमासाठी अरुण अहिरराव- उपाध्यक्ष, भटू पाटील- खजिनदार, लोटण बोरसे, मनोज ठाकूर, जगदिश सोनवणे, राजू वानखेडे, गोपाल पाटील, रवींद्र माळी सर, कविश्र्वर पाटील, चंदन भोळे, चारुदत्त बोरसे,हर्षल सोनवणे आणि इतर सभासद उपस्थित होते.
सदर कार्यक्रम द्रोणाचार्य क्लासेस जुनी सांगवी येथे आयोजित केला होता यावेळेस सर्व खानदेशी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून एकत्र सोन लुटण्याचा आनंद घेतला.शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मंडळाचे संचालक श्री मनोज ठाकूर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
70 Comments