Google Ad
Editor Choice

शंकरशेठ पांडुरंग जगताप ( अध्यक्ष – चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट ) यांचा फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ सप्टेंबर) : काही लोक ध्येयवेडी असतात, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जपणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते समजतात … त्यातीलंच एक नाव म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व उद्योगपती ‘शंकर पांडुरंग जगताप’ होय. शंकर जगताप यांनी किल्ले सिंहगड या राज्य संरक्षित स्मारकावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ व परिसराची स्वच्छता , देखभाल व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या वतीने स्वखर्चाने किल्ले सिंहगड , ता . हवेली , जि.पुणे या राज्य संरक्षित स्मारकाची स्वच्छता , देखभाल व परिरक्षण करण्याकरिता स्वखर्चाने पुर्णवेळ ४ पहारेकरी नेमण्यात आले आहेत.

Google Ad

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वराज्यासाठी उभारलेल्या गड- दुर्गा पैकी शौर्य गाथेचा अलौकिक पराक्रमाचा इतिहास अधोरेखित करून समस्त जगाला शौर्य, त्याग व स्वराज्यनिष्ठा सांगणा-या, झाडे-वेली, दरी, कडे कपारीतून शौर्याचा, स्वराज्य निष्ठेचा संदेश देणाऱ्या सिंहगडाचा शुर मावळा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे देखभाल व दायित्व “चंद्ररंग”, ट्रस्टमार्फत स्वीकारून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे ट्रस्टचे अध्यक्ष उद्योजक शंकरशेठ पांडुरंग जगताप यांचा या दायित्वा बद्दल फिनिक्स सोशल ऑर्गनाझेशन सांगवी यांच्या वतीने आज नरवीर तानाजी मालुसरे समाधी समोर त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्रीगणेश सहकारी बँकेचे व्यवस्थापक ईश्वर उर्फ बाळासाहेब काटे, उद्योजक नेताजी चिवरे तसेच फिनिक्स चे धडाडीचे कार्यकर्ते राहुल विधाटे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

हिमालय ही थरथर कापतो, जेव्हा सह्याद्री उभा राहतो.
जेव्हा शिवरायांचा तानाजी चालू लागतो.
तेव्हा स्वराज्याचा भगवा अभिमानाने डोलू लागतो.”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!