Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

संजय गांधी अनुदान योजनेचे मंजुरी पत्राचे … आमदार ‘आण्णा बनसोडे’ यांचे हस्ते लाभार्थ्यांना वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६सप्टेंबर) : संजय गांधी योजनेतून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप आमदार अण्णा बनसोडे यांचे हस्ते आज करण्यात आले . संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन राज्य शासनाच्या योजनाचा लाभ सामान्य गरजू नागरिकांना व्हावा म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्रासाठी नुकतीच पालकमंत्र्यांनी आमदार बनसोडे यांच्या शिफारसी वरून समिती स्थापनेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते . त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली .

या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे स्थानिक आमदार असतात परंतु बनसोडे त्यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून आनंद बनसोडे या दिव्यांग कार्यकर्त्यास संधी दिली . दरम्यान , या समितीच्या स्थापने पासुन ३ बैठका घेऊन सुमारे ८० प्रकरणांना मंजुरी दिली आहे . यात संजय गांधी निराधार योजनेची ५५ प्रकरणे व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन समितीचे २५ प्रकरणे मंजूर केली आहेत . या पैकी १७ लाभार्थ्यांना आज मंजुरी पत्राचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले .

Google Ad

चालू महिन्या पासुन या लाभार्थ्यांना पेन्शन / सानुग्रह अनुदान सुरु होणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा दिसुन आल्या . कोरोना काळात पती गेल्याने विधवा झालेल्या महिलांना योजनेतून लाभ दिलेला आहे . याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन शासन योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाऊन त्यांना योजना बद्दल माहिती दिली जाने अपेक्षित आहे . पिंपरी विधानसभा क्षेत्रात झोपडपट्टी बहुल भाग अधिक असल्याने हजारो गरीब कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करून प्रामाणिक पणे आपले जीवन जगत आहेत . यांच्यातील अनेकजण निराधार असुन त्यांना मदतीची नितांत गरज असल्याने समिती सदस्यांनी अशा नागरिकांपर्यंत पोहोचणे मला अपेक्षित असल्याचे मत बनसोडे यांनी व्यक्त केले .

पुढील काळात “ शासन आपल्यादारी ” उपक्रम मतदारसंघातील सर्वभागात राबविणार असुन विविध शासन योजनांचा लाभ सामान्य जनतेला देण्यासाठी हा उपक्रम यशस्वी करणार असल्याचा संकल्प बनसोडे यांनी ठेवला .

यावेळी लाभार्थी विना बहिरवडे या आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या , माझ्या कुटुंबाचा आधार गेल्यामुळे मला खूप आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते . मला आता खूप आधार वाटत आहे असे मत व्यक्त केले .

पूर्वी योजनेचे मंजुरी पत्र मिळवण्यात खूप वेळ लागत होता हेलपाटे मारून – मारून थकून जात होतो परंतु काम काही झाले नाही . आता मात्र समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी माझ्याकडे कागदपत्रासाठी पाठपुरावा करून स्वत : सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली व मला लाभ मिळवून दिला , असे मत लाभार्थी किसन देशमुख यांनी व्यक्त केले .

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अध्यक्ष आनंद बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली समिती चांगले काम करीत आहे . योजनेचा लाभासाठी जलदगतीने कमीतकमी कागदपत्रे घेऊन योग्य व गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे शासनास अपेक्षित असल्याचे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.

यावेळी समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे , सदस्य नासरी चौधरी , सदस्या मेघा काळभोर , सदस्य चंद्रकांत कांबळे , शंकर पांढरकर मा . नगरसेवक व इतर पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

234 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!