Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडीतील गरिबांचे तारणहार … ‘संदीप गायकवाड’ यांनी आपल्या बंधूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील गरिबांना दिला आधार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जून) : दापोडीतील सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त संदिपदादा गायकवाड यांच्या प्रयत्नातून व पिंपरी विधान सभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडीत रुग्णवाहिका उद्घघाटन प्रोफेसर एन.जे.पवार सर ( कुलगुरू डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ )
यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी दापोडीतील नगरसेवक रोहितअप्पा काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, अनिकेत काटे, सनी ओव्हाळ, मेहबूब शेख, जनतबी सय्यद, सुप्रिया काटे, भाऊसाहेब म्हस्के, सुवर्णा काळभोर, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. संदिपदादा गायकवाड यांच्या वतीने स्वखर्चाने दापोडी परिसरातील सर्व नागरिकांनसाठी ही रुग्णवाहिकेची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Google Ad

कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकट काळात सेवा करणाऱ्या पोलीस , आरोग्य व वैद्यकीय , पत्रकार सामाजिक या क्षेत्रातील दशरथ तलवारे , जितेंद्र ठोंबरे , प्रिया देवकर , अनिल वडघुले, रमेश भोसले , राजाराम रागपसरे कन्हैय्यालाल चंडालिया , गणेश जवळकर , शोभा थोरात या मान्यवरांना कोविड १ ९ या संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी जे योगदान दिलेले आहे या व्यक्तींना ‘कोविड योद्धा‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याच बरोबर आयुष्यमान भारत योजनेचे ५ लाख रुपयेचे विमा कार्डचेही वाटप यावेळी करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेत प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपये वीमा उपलब्ध आहे. या योजनेत लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रूग्णालयांमधून (जे या योजनेत नावनोंदणी केलेले आहेत) कॅशलेस लाभ घेण्याची मुभा दिली जाईल. या योजनेचे वैशिष्टय म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. सहज सुलभपणे रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारासाठी अनेकांना घरे गहाण ठेवावं लागतं. कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशावेळी ‘आयुष्मान भारत’ योजना ही वरदान ठरणार असून दारिद्यरेषेखाली जाण्याचे दृष्टचक्र थांबेल. असेही संदीप गायकवाड यावेळी म्हणाले.

संदीप गायकवाड यांच्या वतीने दापोडी परिसरातील कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या अनेकांना कोरोनाच्या या संकट काळात अन्नधान्य किटचे मुस्लिम समाजातील काही गरीब कुटुंबाना शिरखुरमा किटचे वाटप, ईदच्या काळात अनेक ठिकाणी खिरीचे वाटप करण्यात आले.

संदिप गायकवाड’ आणि त्यांचे बंधू ‘नितीन गायकवाड’ यावेळी बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात अनेक लोकांना रुग्णालयात पोहचण्यासाठी उशिर झाला त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे काहींनी आपले कुटुंबातील सदस्य गमावले, त्यांचे हाल पहावले नाहीत, आपल्या परिसरातील कोणावरही अशी वेळ येऊ नये. संकटकाळात आपल्या माणसांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळेच आम्ही कुटुंबाने हे सेवाकार्य करण्याचे व्रत हाती घेतले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

85 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!