महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२२ मे २०२१) : शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .२३ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही .
तसेच उद्या दि .२३ / ०५ / २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने उद्या दि .२३ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .
▶️या ठिकाणी होणार लसीकरण :-
तसेच महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .
4 Comments