Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करावा … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी केली जिल्हाधिकऱ्यांकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसीस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. अशा रुग्णांवर वाय.सी.एम.हॉस्पिटल व खाजगी कोविड रुग्णालये, येथे उपचार सुरु आहेत. कोविड रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्णांना या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले Inj. Amphotericin-B इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुणे जिल्हाधीऱ्यांकडे निवेदन देत निदर्शनास आणून दिले आहे.

या निवेदनात लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत शहरातील म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी सदर इंजेक्शनची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. Inj. Amphotericin-B या इंजेक्शनचा पुरवठा आपलेमार्फत वितरीत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असतानाही पिंपरी-चिंचवड मनपाचे वाय.सी.एम. रुग्णालयात अद्यापही सदर इंजेक्शन उपलब्ध झालेले नाहीत. सदर रुग्णालयात अद्यापपर्यंत दाखल झालेल्या ६४ रुग्णांपैकी २३ रुग्णांवर उपचार सुरु असून १० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत ३१ रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत.
याआधीही कोविड-१९ रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी नाहक त्रास सहन करावा लागला आहे , परिणामी काही रुग्ण दगावले गेले, अशी परिस्थिती पुन्हा उभी राहते की काय असा प्रश्न पडत आहे ?

Google Ad

इंजेक्शन अभावी रुग्ण मृत्यमुखी पडत आहे. शहरात म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने या रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी Inj.Amphotericin-B या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे परिणामी रुग्णांसाठी या इंजेक्शनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरात इंजेक्शनच्या मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रुग्णसंख्येनुसार सदर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्यावे.

म्युकरमायकोसीसचा संसर्ग पाहता शहरातील वाय.सी.एम.हॉस्पिटल व सर्व खाजगी कोविड रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिव्हीर प्रमाणेच Inj. Amphotericin-B या इंजेक्शनचा तुटवडा भासू नये म्हणून या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रित करणेबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधितांना आदेश निर्गमित करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

115 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!