Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१९ मे रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या केंद्रांवर मिळणार ही लस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१८ / ०५ / २०२१) : आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून ‘ कोविशिल्ड ‘ व ‘ कोव्हॅक्सिन ‘ लस उपलब्ध झालेली आहे . त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आज ‘ कोविशिल्ड लस ५००० डोस व ‘ कोव्हॅक्सिन ‘ लस २००० डोस उपलब्ध आहेत . शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .१९ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही .

Google Ad

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन्ही लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस घेतला आहे . त्यांना १५ मे २०२१ पासून ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . तसेच ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने उद्या दि .१ ९ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१ ९ / ०५ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला व दुसरा डोस वय वर्षे ४५ वर्षा पुढील लाभार्थ्यांना सोबत जोडण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर देण्यात येणार असून ‘ कोविशिल्ड ‘ चा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) कालावधी पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे . तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!