Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेवकांचा कोरोनाकाळात अनोखा उपक्रम …’नाते जिव्हाळ्याचे, कार्य समृद्धीचे’ … रूग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ चे सर्व नगरसेवक कोरोनाच्या या संकटकाळात अपल्या परिसरातील नागरिकांना तत्परतेने आरोग्य सुविधा मिळाव्यात या करीता आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली व शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेचे कार्य करत आहेत, यापुढेही या सर्वांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवून

नाते जिव्हाळ्याचे..कार्य समृध्दीचे .. ! रूग्ण सेवा , हिच ईश्वर सेवा ..

या सेवेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपली वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारली आहे.

Google Ad

🔴अशी असेल सेवाकार्याची जबाबदारी :-

▶️कोविड बेड हेल्पलाईन क्रमांक : 02067331151/02067331152 महापालिकेच्या क्रमांकावरती संपर्क साधुन सुद्धा बेड उपलब्ध होत नसल्यास बेडसाठी संपर्क साधावा , मा . सागर आंगोळकर ( अध्यक्ष ‘ड’प्रभाग) -9112122424

▶️तसेच कोणत्याही रूग्णाला रूग्णालयात जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स हवी असल्यास १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा . जर वरील नंबरवर संपर्क साधुन देखील अॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नसल्यास अॅम्ब्युलन्ससाठी संपर्क साधवा , मा . शशिकांत ( आप्पा ) कदम ( नगरसेवक ) – 9822434134

▶️ तसेच नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी जाण्याची येण्याची सोय नसल्यास त्यांच्या करीता रिक्षा पाठविण्यात येईल . मनपा शाळेत लसीकरण चालू आहे . त्यासाठी अॅटोरिक्षासाठी संपर्क साधावा . मा . महेश जगताप ( स्विकृत नगरसेवक ) -8669167115

▶️ कोरोनाग्रस्त रूग्ण जे Home Isolation म्हणजेच घरी होम क्वारंटाईन असतील व ज्यांना जेवण बनवण्यास अडचण होत असेल , अशा रूग्णांना घरपोच मोफत जेवण आणून देण्यात येईल . व जेवण मागवायचे असल्यास पुढील क्रमांकाशी सकाळी १० वाजेच्या अगोदर संपर्क साधावा . मा . उषाताई मुंढे ( नगरसेविका ) – 8975750652
मा. चंदाताई लोखंडे ( अध्यक्षा- महिला बालकल्याण समिती ) -7887887902

प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या संकट काळात संकट प्रसंगी संपर्क साधण्याचे आवाहन या भागातील नगरसेवक शशिकांत ( आप्पा ) कदम, सागर आंगोळकर, उषा मुंढे, चंदा लोखंडे आणि महेश जगताप यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!