Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहराचा गुरुवार, २६ नोव्हेंबरचा पाणी पुरवठा असा असेल !

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून येणाऱ्या उच्च दाबाच्या पंपिंग मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविणेसाठी व तसेच रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र येथील विद्युत विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करणे , सेक्टर क्र .२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दि .२६ / ११ / २०२० रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे .

दि .२६ / ११ / २०२० रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल . त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा दुपारचा तसेच सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही . दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस – या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि .२७ / ११ / २०२० रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे . तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन म.न.पा.स सहकार्य करावे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

76 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!