Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची प्रभाग निहाय पदाधिकारी निवड जाहीर …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या प्रभाग निहाय पदाधिका-यांची निवड नुकतीच जाहीर करणेत आली. कर्मचारी महासंघाचे कामकाज सुलभरीत्या व्हावे तसेच संघटनेचा विस्तार वाढावा या उदेशाने कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी एकूण आठ ही प्रभागाची कार्यकारिणी निश्चित करून त्यातून पदाधिका-यांची निवड केली.

Google Ad

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय येथील नवनियुक्त पदाधिका-यांचा नामोल्लेख असलेल्या फलकाचा आनावरण समारंभ आज दिनांक २४/११/२०२० रोजी आयोजीत करणेत आला होता. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या फलकाचे तसेच ग क्षेत्रीय कार्यालयाच्या फलकाचे अनावरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर किसनराव चिंचवडे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ब क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी , ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, सहायक आरोग्य अधिकारी कुलकर्णी साहेब तसेच प्रभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष पदी तुषार काळभोर, उपाध्यक्ष पदी राजू केंगार, सचिव पदी परशुराम कदम, सहसचिव पदी संतोष ओव्हाळ, संघटक पदी गुलाब हिले, व प्रवक्ता म्हणून किशोर सोनवणे यांची निवड झाली तसेच ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष पदी हेमंत जाधव, उपाध्यक्ष पदी अतुल जोशी, सचिव पदी श्रीम. माधवी पंडित, सहसचिव पदी महादेव साबळे, संघटक पदी चेतन कांबळे, व प्रवक्ता म्हणून संदीप गव्हाणे यांची निवड करणेत आली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!