Google Ad
Editor Choice Pune District

Junner : मोफत बेडसाठी लुबाडले तब्बल 1 लाख 80 हजार … पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८मे) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशासह राज्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसागणिक समोर येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरही ताण आला आहे. अशातच उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी वणवण करावी लागत आहे. अशातच अनेक समाजकंटक यावेळीही काळाबाजार करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मोफत बेडसाठी रुग्णांकडून पुन्हा एकदा एक लाख ऐंशी हजार रुपये लुबाडण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयात ही धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

तसेच बेडसाठी पैशाची मागणी करणाऱ्या आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अमोल पवारला बेड्या ठोकण्यात आल्यात. अशातच महापालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयातील कर्मचारीही या प्रकरणात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस कसून तपास करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!