Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स सामान्य नागरिकांना वापरण्याकरिता मोफत उपलब्ध करुन देणार … येथे करा संपर्क

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स सामान्य नागरिकांना वापरण्याकरिता मोफत उपलब्ध करुन देणार आहे. कोविड -१९ साथरोगास प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी विविध उद्योजकांकडून CSR अंतर्गत महापालिकेस सहकार्य मिळत आहे .

त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मे.स्टार्क कंपनी , भोसरी , मे.युनायटेड वे , दिल्ली , एम.सी.सी.आय.ए. , व सेव्ह द चिल्ड्रन ऑर्गनायझेशन यांचेकडून ७० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झालेले आहेत . तसेच कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सी.आय.आय. ) यांचेकडून आणखी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स उपलब्ध होणार आहेत .

Google Ad

सदर प्राप्त झालेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपलब्ध व्हावेत याकरिता सतिश इंगळे , कार्यकारी अभियंता , स्थापत्य यांचे समन्वयक म्हणून नेमणूक करणेत येत आहे . त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ७७६८००५८८८ हा आहे .

महापालिका हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मागणी केल्यास प्राप्त ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मधून नागरिकांचे घरी पोहोच करुन Install करुन देणे ही सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येणार आहे . याकामी एक वैद्यकीय अधिकारी व तीन कर्मचारी मदत करणार आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

43 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!