Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने व मा . नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या प्रयत्नांतुन … खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येतून होणार रहाटणीकरांची सुटका !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील मागील काही दिवसांपासून रहाटणीतील नखाते वस्ती , सनशाईन नगर , तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मागील काही दिवसांपासून सातत्याने खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते . वेळी – अवेळी , नागरिकांच्या कामाच्या गडबडीत वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची , महिलांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती .

नागरिकांच्या या समस्येबाबतीत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने सातत्याने MSEB च्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून नखाते वस्ती , सनशाईन नगर येथे नवीन ब्रेकर बसविण्यात आल्याने अखेर रहाटणीकरांची सततच्या वीज समस्येतून सुटका झाली आहे .

Google Ad

काल ( रविवारी ) नखाते वस्ती , सनशाईन नगर परिसरात नवीन ब्रेकर ( पॅनल ) बसविण्यात आला आहे . या ब्रेकरमुळे सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा , स्पार्किंग , जंप कट अशा अनेक समस्या मार्गी लागणार आहेत . तसेच वीज गेल्यास दुसरीकडून वीज पुरवठा घेण्यास वेळ लागणार नाही . महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी सर्व केबल्स पोलवर होत्या . मात्र आता नवीन ब्रेकर बसविण्यात आल्याने रस्त्यावरील सर्व पोल काढून टाकण्यात येणार आहेत . यावेळी स्वत : बाबासाहेब त्रिभुवन यांनी संपूर्ण काम जागेवर उपस्थित राहून आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले . या कामासाठी एमएसईबी विभागाचे अभियंता श्री . ननावरे यांचे सहकार्य लाभले . यावेळी माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर व युवा महाराष्ट्र केसरी पै . किशोर नखाते हेदेखील उपस्थित होते .

यासंदर्भात बोलताना बाबासाहेब त्रिभुवन, ‘ म्हणाले की , सततच्या वीज समस्येबाबत मी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने वारंवार एमएसईबी कार्यालयाकडे पाठपुरावा करीत होतो . अखेर त्या प्रयत्नांना यश आले आहे . त्याबद्दल समस्त रहाटणीकरांचा प्रतिनिधी या नात्याने मी अभियंता श्री . ननावरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो . भविष्यातही रहाटणीकरांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आणि तत्पर आहे . पुढील काळात सर्व प्रभागांमध्ये असे ब्रेकर बसून पूर्ण प्रभागातील समस्या सोडवण्यात येतील अशी मी आपणास नम्रपणे ग्वाही देतो , असेही त्रिभुवन यावेळी म्हणाले .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!