Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागामध्ये नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत महापौर आणि आयुक्त , म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० ऑगस्ट २०२१) : नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून त्या अधिक उत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम करावे अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या. 

   
महानगरपालिकेच्या ह प्रभागामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण, वैद्यकीय, आरोग्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांबाबत नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य व अधिकारी यांच्या समवेत आज बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

Google Ad

यावेळी प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे,  नगरसदस्या माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, अशोक भालकर, संदेश चव्हाण, मकरंद निकम, रामदास तांबे, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, सुनिल भागवानी, अजय सुर्यवंशी, प्रमोद ओंभासे,  राजेंद्र राणे, बापुसाहेब गायकवाड, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सांगवी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर आदी उपस्थित होते.

मुळानगर झोपडपट्टीतील अनधिकृत नळकनेक्शन बाबत कारवाई करावी.  शितोळेनगर ते अहिल्यादेवी चौक भागातील अनधिकृत हातगाड्यांवरील अतिक्रमण कारवाई करण्यात यावी, विद्युत दाहिनीबाबत समस्या सोडविण्यात याव्या.  १८ मीटर रस्त्यावरील राडारोडा काढण्यात यावा आदी सूचना नगरसदस्यांनी केल्या.  सांगवी आणि औंध यांना जोडणा-या पूलाचे उद्घाटन लवकर करावे व नागरिकांसाठी खुला करावा.  ममतानगर येथील कल्चरल सेंटर आणि प्ले ग्राऊंडचे भूमीपूजन करण्यात यावे.  महाराजा हॉटेल ते माकन चौक रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा होत असून पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे.

भुसंपादनाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करावे.  पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. सांगवी येथे सोनाग्राफी आणि एक्स रे चे मशीन उपलब्ध करुन द्यावे. कचरा उचलणा-या कर्मचा-यांची संख्या वाढवावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. परस्पर झाडे तोडणा-यांवर कारवाई करावी. दलदलीच्या भागात डासांचा प्रार्दुभाव कमी व्हावा यासाठी आरोग्य विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी दिल्या.

यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले, डिसेंबर अखेर रोडची कामे पूर्ण होतील.  सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टीकचे काम ३ महिन्यात पूर्ण होईल.  शहरातील कचरा उचलणे आणि त्याचे विलगीकरण करणे तसेच कच-याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.  झाडांच्या फांद्याची छाटणी प्रभाग स्तरावर करण्यात येईल.  महत्वाच्या आणि तातडीचे कामांसाठी तरतूद वर्ग करण्यात येईल.  सांगवी येथील वीजपुरवठा विषयक समस्यांबाबत महावितरण पुणे यांच्याशी संपर्क साधून समस्या सोडविली जाईल.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या लोकप्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका घेत असून त्यामागील उद्देश शहरातील समस्या सोडविणे हा आहे.  त्यामुळे अधिका-यांनी लोकप्रतिनिधींच्या समस्याबाबत गांभीर्याने विचार करुन त्या त्वरीत सोडवाव्यात याबाबत २ महिन्या नंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे याची दखल घ्यावी व त्यानुसार कार्यवाही करावी असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!