Google Ad
Editor Choice

W.Bangal : भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का… 

महाराष्ट्र 14 न्यूज : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे लग्न लावून देण्यासाठी त्या दोघांचे कुटुंबीय तयार होते. परंतु, हे दोघे अल्पवयीन असल्यामुळे मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. त्यावरून या मुला-मुलीमध्ये वाद झाला आणि या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Google Ad

आत्महत्या करण्यापूर्वी या मुलाने मुलीला फोन केला होता आणि तो आत्महत्या करणार असल्याचे तिला सांगितले होते. त्यानंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या मैत्रिणीला त्याचा फोटो पाठवला आणि आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. मुलाचा मृतदेह जेव्हा गावात आणला गेला, तेव्हा वाद सुरु झाले. गावकऱ्यांनी मुलाच्या आत्महत्येला मुलगी आणि तिची आई जबाबदार असल्याचे म्हणत त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी त्या दोघींना मारहाण केली आणि मुलाच्या मृतदेहाशेजारी आणून बसवले. त्यानंतर मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुलगा आत्महत्या करीत असल्याचे मुलीला माहित होते. त्या मुलीकडे मुलाच्या आईचा फोन नंबर देखील होता. मात्र, तरीही तिने मुलाच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली नाही. तिने वेळीच याबाबत मुलाच्या कुटुंबीयांना सांगितले असते तर त्यांनी मुलाला वाचवले असते.
पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलीच्या आईने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लवकरच दोषींना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!