Google Ad
Editor Choice Pune District

Manchar : ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंचर शहरात वाढवला पुन्हा लॉकडाउन … अंमलबजावणी सुरु, शहर बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल ४६ लाखांचा टप्पा पार केला असून ७७ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १०,३७,७६५ वर गेली आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे, शहरात गेल्या दोन दिवसात ३० हजार नागरिकांच्या केलेल्या सर्वेक्षणात २१० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ७५८ झाली आहे . ३७२ जण अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोविड सेंटर , मंचर उपजिल्हा रुग्णालय , भीमाशंकर हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी, सचिन उंडे यांनी दिली.

Google Ad

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गुरुवार १७ सप्टेंबर पर्यंत शहरात पुन्हा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरु केली आहे . यापूर्वी शनिवार ५ सप्टेंबर ते शुक्रवारपर्यंत ११ सप्टेंबर पर्यंतशहर बंद ठेवले होते . मंचर शहरात गेली दोन दिवस मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आले . कोरोना संसर्गाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी मंचर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली . त्यात गुरुवार १७ सप्टेंबर पर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , राजाराम बाणखेले, अरुणा थोरात , बाळासाहेब बाणखेले , दत्ता गांजाळे , वसंतराव बाणखेले, महेश मोरे, संजय थोरात , राजू इनामदार , अजय घुले, अल्लू इनामदार , युवराज बाणखेले , राजेंद्र थोरात परिसरातील ग्रामस्थ व व्यापारी वर्ग उपस्थित होते .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!