Google Ad
Editor Choice

नवी सांगवीत ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये विविध कलागुणांवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन … विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक-१८/१०/२०२२) : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला व एक वेगळा अनुभव अनुभवला.

यावेळी विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ राहण्यासाठी योगा प्रात्यक्षिके योगा शिक्षक मीना पवार व मेघना झांजुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आणि योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
दिवाळी सणाचे औचित्य साधून दिवाळीसाठी उपयोगात आणणारे वस्तू या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्या. त्यामध्ये पणत्या रंगविणे, पौष्टिक लाडू तयार करणे, प्लास्टिक कागदाचा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली आकाश कंदील व कागदी दिवे तयार करणे तसेच विविध पौष्टिक पदार्थ स्वतःच्या हाताने तयार करणे यांचे अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले.

Google Ad

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजू अण्णा जगताप, सचिव शंकर शेठ जगताप यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्था सदस्य सौ स्वाती पवार मॅडम, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी मॅडम,माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!